लेखक म्हणून मला ‘संवाद’ ही गोष्ट अतिशय महत्त्वाची वाटते... ती टिकून राहायला हवी...
विचारांच्या स्वातंत्र्यावर बांध घालण्याचे प्रयत्न यथाशक्ती, विविध संघटनांकडून, समूहांकडून, पक्षांकडून होतच असतात. पण आता सोशल मीडियाचा यात एखाद्या हत्यारासारखा वापर केला जातो, जे धोकादायक आहे. जी गोष्ट मुळात मुक्त संवादासाठी योग्य आहे, ज्यातून अनेक नव्या कल्पना पुढे येऊ शकतात, संवाद होऊ शकतो, तिचा असा नकारात्मक वापर टाळता आला, तर समाज म्हणून आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होऊ शकेल.......